अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथील जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदीराच्या बाजुस वडाच्या झाडाखाली जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यावरून पोलिस पथकाने छापा टाकला असता तेथे ५ जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८ हजार ७२० रुपये रोख रक्कम, जुगार साहित्य, तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पो. काँ. विकास कारखिले यांच्या फिर्यादीवरून रामनाथ कचरु मगर (वय २८) , भिवसेन दिलीप मगर (वय ३२), संतोष सुदाम मगर (वय ३८) वर्ष,
उमेश दत्तात्रय गोंठे (वय ४३), राजु सर्जेराव साळवे (वय ३६, रा.कोडेगव्हाण) यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|