अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- टाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू अड्डे उद्ध्वस्त केले.
याप्रकरणी चार जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके
यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. संबंधित पथकाने तात्काळ टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.
तेथून 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संजय कारभारी गांगुर्डे (रा. माळेवाडी, टाकळीभान), गणपत डुकरे (रा. टाकळीभान), शांताबाई गणपत जाधव (रा. गावठाण, टाकळीभान), आशाबाई शिवाजी पवार (रा. गावठाण, टाकळीभान) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम