अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-शहराची झेंडीगेट परिसरात एका ठिकाणी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सुमारे 25 ते 30 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी आज सुटका केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज रविवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी शेडमध्ये जनावरे डांबून ठेवल्याची माहिती शहर उपअधीक्षक ढुमे यांना मिळाली होती.

file photo
त्यांनी कोतवाली पोलिसांचे पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान हि कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे,
कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|