राजकारण्यांनी देखील स्वत:ची काळजी घ्यावी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाची दुसरी लाट अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरत असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी

आरोग्य विभागासह राज्यातील सर्वच पक्षातील नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

असे असले तरी या महामारीमध्ये सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेते मंडळींना देखील आपला जीव गमावला आहे.

त्यांनी देखील स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या उषाताई कराळे यांनी केले आहे.

मिरी तालुका पाथर्डी येथे लोकसहभाग व लोकवर्गणीतून सुरु करण्यात आलेल्या राजयोग कोविड सेंटरचे उद्घाटन श्रीमती कराळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ.वेणूनाथ महाराज वेताळ, कोवीड सेंटरचे प्रमुख विजय कोरडे, माजी सरपंच संतोष शिंदे, जगदीश सोलाट, शिवसेना नेते एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी,

उध्दव दुसंग, ज्येष्ठ नेते राजेंद्र तागड आदीनाथ झाडे, सोमनाथ झाडे, गौतम कराळे, डॉ.श्याम कोरडे, डॉ.नरसाळे, डॉ.नरवडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe