अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील आनंद कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन मंत्री प्रसाद तनपुरे व आमदार मोनिका राजळे यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
आमदार राजळे या कार्यक्रमाच्या नियोजीत अध्यक्षा होत्या. शासकीय विश्रामगृहामधे शिवशंकर राजळे यांनी तनपुरेंना कानमंत्र दिला आणि मंत्री तनपुरे अचानक आले आणि उद्घाटन करुन गेले.

मंत्री अचानक आले… त्यांनी कोवीड सेंटरचे उद्घाटन केले आणि ते सरळ निघुन गेले. नियोजीत कार्यक्रमात बदल झाल्याने आमदार मोनिका राजळे मात्र नाराज होवुन शहरातुन उद्घाटनाला न येता निघुन गेल्या.
पाथर्डीत बर्ड संस्था वश्रीतिलोकजैन विद्यालयाच्या वतीने महिलांसाठी ५० बेडचे कोवीड सेंटर सुरु केले आहे. आमदार राजळे यांच्या हस्ते आनंद कोवीड सेंटरचे उद्घाटन ठरले होते. उद्घाटनच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती.
नगराध्यक्ष डॉ.मृंत्युजय गर्जे यांनी तसे निमंत्रणही दिले. आयोजक डॉ.दिपक देशमुख व शिरीष जोशी यांनी कोवीडसेंटरच्या जवळच शासकिय विश्रामगृहावर आलेल्या मंत्री प्राजक्त तनपुरे यांना अचानक कोवीड सेंटरच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली.
मंत्री तनपुरे यांनीही लगेच होकार दिला. ते आले त्यांनी उद्घाटन केले व भाषणबाजी न करता ते निघुनही गेले. नियोजीत उद्घाटक आमदार मोनिका राजळे यांना ही घटना समजली आणि त्यांनी मात्र कार्यक्रमाला येण्याचे टाळले.
कोवीड सेंटरच्या उद्घाटनला जाण्यापुर्वी शिवशकंर राजळे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कानात काय कानगोष्ट सांगितली. राजळेंच्या कानगोष्टीची चर्चा पाथर्डीतल्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगु लागली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|