अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा शिवाजी चौकातच झाला पाहिजे.
नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी पुतळ्याची जागा बदलण्याची कोणतेही कारस्थान केले, तर ते खपवून घेतले जाणार नाही,

असा इशारा देत गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीने गुरुवारी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीचे सर्वश्री प्रकाश चित्ते, बाबा शिंदे, नगरसेवक किरण लुणिया, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, बाजार समिती संचालक मनोज हिवराळे, अभिजित कुलकर्णी, सोमनाथ कदम,
सॅण्डी पवार, प्रवीण पैठणकर, बबन जाधव, संदीप वाघमारे, अर्जुन करपे, महेश विश्वकर्मा, सुहास पवार, रवी चव्हाण, विकास चव्हाण, बाळासाहेब हिवराळे, संजय यादव, सोमनाथ पतंगे, संदीप साठे, गणेश खरात, सतीश ससाणे, रवी गायकवाड,
विकी देशमुख, नीलेश फासाटे आदींनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला पाहिजे. त्यासाठी लवकरच श्रीरामपूर नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी,
अशी मागणी नगरसेवक किरण लुणिया यांनी केली. शिवाजी चौक येथे शिवजयंतीच्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवल्याप्रकरणी शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी पोलिस नाईक भारत हरिभाऊ पंडित यांच्या फिर्यादीवरून शिवप्रहार संघटनेचे चंद्रशेखर आगे,
प्रदीप बाजारे, प्रशांत भोसले, उमेश शर्मा, योगेश बोऱ्हाडे, गणेश माळवे, सागर बाजारे, सर्व रा. बजरंगनगर, बेलापूर रोड,
वार्ड नंबर ७, श्रीरामपूर व इतर ४ जण अशा तरुणांवर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फियादीत म्हटले असून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा १० फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा बसवताना आढळून आले.
श्रीछत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन परिणाम भोगावे लागतील,
असा इशारा दिला. यावेळी समितीचे प्रकाश चित्ते, डॉ. दिलीप शिरसाठ, सुभाष जंगले, बाबा शिंदे, संजय यादव, संजय पांडे, सुभाष त्रिभुवन, सरपंच महेंद्र साळवी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|











