जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर मतदान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ज्या चार जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत

त्या चार जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. १९) मतदान होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, नगर तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन मतदान केंद्र आहेत. बिगर शेती पूरकसाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर बिगर शेती मतदारसंघातील मतदारांना मतदान करता येणार आहे.

ही आहेत १४ मतदान केंद्र

  • राहाता- जिल्हा परिषद शाळा
  • राहुरी- लालाशेठ बिहाणी प्रशाला
  • संगमनेर- भिकाजी तुकाराम मेहर विद्यालय
  • शेवगाव- आदर्श विद्यामंदिर शाळा
  • अकोले- जिल्हा परिषद शाळा
  • जामखेड- जिल्हा परिषद शाळा
  • श्रीगोंदा- जिल्हा परिषद शाळा
  • श्रीरामपूर- दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा
  • कर्जत- जिल्हा परिषद शाळा
  • कोपरगाव- नगरपालिका शाळा
  • नगर- राष्ट्रीय पाठशाळा
  • नेवासा- जिल्हा परिषद शाळा
  • नेवासा, खुर्द पारनेर- न्यू इंग्लिश स्कूल
  • पाथर्डी- जिल्हा परिषद शाळा
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe