अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- पूजाच्या आई-वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले आहे.
त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडू शकणार नाहीत. असा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे.
पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही.
याप्रकरणात आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत. असे शांता राठोड यांनी म्हटले.
पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत.
सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा.असेही शांता राठोड यांनी सांगितले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|