विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिलेच्या घराशेजारी कोपरगाव येथे राहात असलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेशी ओळख केली.

एकमेकाच्या जवळ आले, मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने या महिलेने एक वर्षापूर्वी आरोपीविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती.

दरम्यान आरोपीने महिलेच्या फोटोची एक अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली. ही व्हिडिओ क्लिप दाखवून महिलेस विनयभंगाची तक्रार मागे घे अन्यथा ही क्लिप व्हायरल करेल अशी धमकी आरोपी देत होता पण महिलेने जुमानले नाही.

म्हणून आरोपीने फिर्यादीचे अश्लील फोटोचा व्हीडीओ तयार करुन लिंक वर व्हायरल केली. याबाबत महिलेने कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe