पोर्नोग्राफी ! नवऱ्याच्या कारनाम्यामुळे बायको सापडली चौकशीच्या भोवऱ्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  लंडनच्या ‘हॉटशॉट’ अ‍ॅपला पोर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा याला वांद्रे न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कुंद्राच्या अनेक व्यवसायांमध्ये भागीदार असल्यामुळे आता शिल्पा शेट्टी चीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीच्या घरात छापेमारी केली. या वेळी राज आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीला हे 10 प्रश्न विचारण्यात आले होते.

  • वियान कंपनी खूप चांगली कमाई करत होती. शेअर मार्केटमध्ये तिचा भाव वाधारला होता तरी देखील कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला?
  • वियान आणि कॅमरिन या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
  • पोर्न व्हिडीओ लंडनला पाठवण्यासाठी वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जात होता. याबद्दल तुम्हाला माहिती होती का?
  • हॉटशॉट या अॅपबद्दल काही माहिती आहे?
  • हॉटशॉटवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओंविषयी काही माहिती आहे का?
  • हॉटशॉटच्या व्यवहारांत तुम्ही देखील सामिल आहात का?
  • प्रदीप बक्क्षीसोबत हॉटशॉटबद्दल कधी चर्चा केली का?
  • पोलिसांच्या हाती लागलेल्या ईमेल आणि वॉट्स अॅप चॅटबद्दल काही माहिती आहे का?
  • राज कुंद्राच्या व्यवसायाविषयी काही माहिती आहे का?
  • तो नेमका काय व्यवसाय करतो?
  • राज कुंद्रा आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती देतो का?
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News