विमान प्रवासासाठी पॉझिटिव्ह अहवाल केला निगेटिव्ह…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- विमानप्रवासासाठी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला असताना त्यात फेरफार करून तो निगेटिव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत मंगळवारी समोर आला आहे. एकाच कुटुंबातील तिघे जण मुंबईहून जयपूरला विमानाने जाणार होते. त्यासाठी त्यांनी हा ‘उद्योग’ केला.

याप्रकरणी थवानी कुटुंबातील तिघांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार येथील थवानी कुटुंबातील तिघांनी फेब्रुवारीत आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले होते.

कोरोनाची लागण झाल्याने पालिका एच पश्चिम वॉर्डाचे डॉक्टर ओम प्रकाश जैस्वाल यांना थवानी यांनी त्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. त्यानंतर जैस्वाल यांनी थवानी यांना व्हॉट्सऍपवर अहवाल पाठवण्यास सांगितले. थवानी यांनी तो खासगी लॅबचा अहवाल डॉ. जैस्वाल यांना पाठवला. तो अहवाल बनावट होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe