अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला शनिवार (ता.१०) पासून जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले आहे.
शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील सर्व दुकाने बाजारपेठा शुक्रवार (ता.९) रोजी रात्री आठपासून कडकडीत बंद करण्यात आली आहेत.
या बंदमुळे शनिवारी सकाळपासून रस्त्यांवर शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणा-या येणा-यांना सूट दिली जात आहे.
सकाळी दुध, किराणा दुकाने उघडली होती, मात्र पोलिसांनी ती बंद केली. भाजीपाला विकणारे आले नाहीत.
सकाळी दुध विक्री सुरू होती. अकरानंतर तीही बंद करण्यात आली. नगरमधील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरेही बंद आहेत. रस्त्यावर मेडीकल वगळता एकही दुकान सुरू नाही. विकेंड लॉकडाऊनला दुकानदार, विक्रेते, नागरिक यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|