अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायीकाच्या मालमता लिलावास महसूल व वन विभागाने स्थगिती दिली आहे. लिलावासाठी ठेवलेली मालमत्ता संबंधिताने यापुर्वीच विक्री केली असून, या व्यवहाराची महसुलकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे.
पाथर्डी शहरातील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांना २०१६ साली अवैध गौण खनिज प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी ३७ लाख रुपयांचा दंड केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्यांची अनेक वाहने जप्त केली होती.
अग्रवाल यांनी यापुर्वी दंडाची १४ लाख ९२ हजार रुपयाची रक्कम भरली होती. राहीलेल्या रक्मेसाठी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी अग्रवाल यांना २० लाख ४१ हजार रुपये तातडीने भरण्याची नोटीस बजावली.
ही रक्कम न भरल्यास केकाण यांनी अग्रवाल यांच्या पाथर्डी शहरातील एका मालमत्तेचा लिलाव करणार असल्याचे अग्रवाल यांना कळवले होते. मात्र ज्या जागेचा लिलाव करण्यात होणार होता ती मालमत्ता अग्रवाल यांनी इतरांना या पूर्वीच विकली आहे. तशी नोंद दुय्यम निंबंधक कार्यालयात सुद्धा केली .
महसुल दप्तरी नोंद मात्र झालेली नाही. या लिलाव प्रक्रिये विरोधात अग्रवाल यांनी मंत्रालयात धाव घेतल्या नंतर या सर्व प्रक्रियेला महसूल व वन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी संदीप पाटील यांनी स्थगिती दिली.
त्यामुळे लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आली. जी मालमत्ता अग्रवाल यांच्या मालकीची नाही तिचा लिलाव ठेवल्याने मात्र नवल व्यक्त केले जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम