विजेचा खेळ खंडोबा; बळीराजा झाला हैराण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ लागत असल्याने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली हं . दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, याला शेतकरी वैतागले आहेत. सिंगल फेज लाईट सुमारे दहा तास बंद राहत आहे.

तसेच थ्री फेज लाईट पूर्णदाबाने मिळत नसल्याने विद्युत मोटारी चालत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पाणी द्यावे लागत आहे. दिवसा होल्टेजची समस्या येत असून, विद्युत मोटारी चालत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालूवर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी उपलब्ध आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात गावरान कांदा, लसूण, गहू, हरभरा, मका, ज्वारीची पेरणी केलेली आहे.परंतू विहिरीत पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना पाणी देता येत नाही. महावितरण कंपनीने जेऊर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी उपसरपंच श्रीतेश पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News