अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-उर्जा राज्यमंञी ना.प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यातील व खा. डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात असलेल्या डॉ.तनपुरे साखर कारखान्याचा थकीत विज बिल न भरल्याने वीजपुरवठा आज २३ जुलै रोजी दुपारी महावितरणने खंडीत केला आहे.
त्यामुळे कारखाना कॉलनी परिसरातील कामगार वर्गातून संताप व्यक्त होत आहे. डॉ.तनपुरे साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. या विजबिलापोटी कारखाना आपले बिल अदा करत असते.
परंतु गेल्या अनेक महिन्यांचे वीज बिल थकले असून थकीत वीज बिलाचा आकडा कोटीत आहे. अहमदनगर येथील महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी थकीत रकमेपोटी रक्कम अदा करण्यासाठी हप्ते पाडुन दिले असतानाही
कारखाना व्यवस्थापनाने सदर वीज वीज बिल न भरल्यामुळे आज दुपारी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विज पुरवठा खंडीत केला आहे. कारखाना व्यवस्थापक यांनी विज बिल न भरल्याने
कारखाना परिसरात विशेषत: कामगार वसाहतीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे कारखाना कामगार वसाहतीत गवताचे प्रमाण वाढले असून डासांची मोठ्या प्रमाणात उतपत्ती वाढली आहे.
एककिडे अंधार तर दुसरीकडे डासांचा उपद्रव अशा संकटात कामगार कुटुंबीय सापडले आहे. उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यातील व खा.डाँ.सुजय विखे यांच्या ताब्यातील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा विज पुरवठा थकीत बिलामुळे खंडीत केल्यामुळे खळबळ उडाली असुन त्यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम