उद्धव ठाकरेंचे कौतुक, तर काँग्रेसला सल्ला; रामदेव बाबा यांचे बिनधास्तपणे भाष्य

Content Team
Published:

मुंबई : काल जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कर्तृत्वाचे व धाडसाचे कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच समाजात महिलांना प्रमुख दर्जा व महिलांविषयी आदर यावर सर्वत्र संदेश देण्यात येत आहेत.

या निमित्ताने काल ९ मार्चला रत्नागिरीतील (Ratnagiri) छत्रपती शिवाजी स्टेडियम (Chhatrapati Shivaji Stadium) येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले होते. रामदेव बाबा (Ramdev Baba) या योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना घेरले असता त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावेळी रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच काँग्रेसपक्ष (Congress) यावर बिनधास्तपणे भाष्य केले आहे.

यावेळी बाबा रामदेव यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत ते महाराष्ट्रात चांगल काम करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत, असं विधान त्यांनी केले आहे.

मुख्य गोष्ट म्हणजे वीर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवा. आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल, असा विश्वासही यावेळी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.

तसेच भाजपसोबत (Bjp) केजरीवालसुद्धा चांगली कामगिरी करेल. काँग्रेसला राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे, राष्ट्रीय स्तरावर आणखी नेतृत्वात ओजस्वीत मिळाली तर काँग्रेस अधिक बळकट होईल, असे म्हणत काँग्रेस पक्षात बदलाची गरज आहे असे त्यांनी यावेळे सांगितले आहे.

दरम्यान, या दौऱ्यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर याच ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली आहे.

तसेच रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असे एक्झीट पोलमधून दिसतंय, काही लोकांना वाटले होते ५ राज्यांमध्ये बीजेपी रसातळाला जाईल पण तसे होत नाही, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe