अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मात्र नेवासे तालुक्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे. रॅपिड अँन्टीजन तपासणीत तामसवाडी गावात १९ रुग्ण आढळल्याने या रुग्णांसह आणखी चार रुग्णांना टेम्पोत कोंबून भेंडे (ता. नेवासे) येथील कोविड सेंटरला दाखल केले.
तब्बल २५ किमीचा हा प्रवास रुग्णांसह नागरिकांना धोकादायक ठरणारा ठरला. या रुग्णांनी भेंडेकडे प्रवास सुरू असतानाच काही ठिकाणी काही वस्त्ू व सामानांची खरेदीही केली.
भेंडे येथील काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या टेम्पो चालकास विचारणा केली असता आम्ही वाहन सॅनिटाईझ करून रुग्णांना बसवल्याचे सांगितले.
दरम्यान, उपकेंद्रास वाहन नसल्याने काहींनी आरोग्य विभागाच्या परस्पर खासगी वाहनांतून रुग्ण नेण्याचा निर्णय घेतला
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|