प्रतीक्षा ताईंनी आवडीचे केले व्यवसायात रूपांतर! विदेशातील नोकरी सोडली आणि सुरू केला बांबूच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय, वर्षात केली 30 लाखांची उलाढाल

Ahmednagarlive24 office
Published:
jungle bound

प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची आवड असते व अशा प्रकारची आपली आवड जोपासण्यासाठी आपल्या दैनंदिन कामांमधून वेळ काढून आपल्या आवडी कडे लक्ष दिले जाते. परंतु आपल्याला असलेल्या एखाद्या गोष्टीचे आवड व त्या आवडीचे व्यवसायात केलेले रूपांतर व त्यातून उभारलेला लाखो रुपयांचा व्यवसाय मात्र आपल्याला फार कमी प्रमाणात दिसून येतो.

तसेच दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी लाखोंच्या पॅकेजेची नोकरी करत असाल तर मात्र तुम्हाला कुठल्याही गोष्टींची आवड असली तरी आपण त्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करत नाही व नोकरी सोडून एखादा व्यवसाय उभारावा याचा विचार देखील कधी करत नाहीत. परंतु या सगळ्या मुद्द्याला प्रतिक्षा शेळके या तरुणी मात्र अपवाद ठरल्यात. परदेशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी असून देखील त्यांनी कोरोनाच्या कालावधीत नोकरी सोडली आणि दुसऱ्या लाटेत बांबू आणि इतर लाकडापासून दैनंदिन वापरामध्ये ज्या आवश्यक वस्तू असतात त्या बनवायला सुरुवात करून त्यांची विक्री करायला सुरुवात केली. आज त्यांचा हा व्यवसायाचा टर्नओव्हर लाखोंमध्ये पोहोचलेला आहे.

प्रतीक्षा शेळके यांची यशोगाथा

प्रतीक्षा शेळके यांचे पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे संपूर्ण शिक्षण आणि संगोपन हे पुण्यासारख्या शहरात झाले. पुणे या ठिकाणहून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व पुढील शिक्षण घेण्यासाठी ते युएसला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केले व जीप आणि बीएमडब्ल्यू या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. परंतु प्रतीक्षा यांना इको फ्रेंडली वस्तू बनवण्याची एक उपजत आवड होती व त्यामुळे त्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करावे हा विचार त्यांच्या मनामध्ये चालू होता.

या विचारात असतानाच त्यांनी नोकरी सुरू असतानाच इको फ्रेंडली वस्तू बनवता याव्या त्याकरिता 2020 साली भारत गाठले. इथूनच त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली व पुण्याजवळील शिवणे या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष लाकूड आणि बांबूपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवण्याचा कारखाना सुरू केला व या कारखान्याला त्यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अनुदान मिळवून व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. या कारखान्याच्या माध्यमातून लाकूड आणि बांबू पासून जे वस्तू तयार केल्या जात होत्या त्यांचा जंगल बाउंड नावाचा ब्रँड सुरू केला व या ब्रँडखाली त्यांनी लाकूड आणि बांबू पासून बनवलेल्या सर्व वस्तूंची विक्री करायला सुरुवात केली व आजही सर्व वस्तूंची विक्री याच ब्रँडखाली होत आहे.

त्यांच्या या कारखान्याच्या माध्यमातून ऑफिसमध्ये लागणाऱ्या वस्तू तसेच घरात दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू, हॉटेल, कार्पोरेट क्षेत्रात भेट देण्यासाठी लागणाऱ्या तसेच ट्रॉफी, लॅपटॉप स्टॅन्ड, मोबाईल स्टॅन्ड तसेच मोबाईल स्पीकर अशा अनेक वस्तू या कारखान्यात बनवल्या जातात व ग्राहकांची मागणी जशी असेल त्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू डिझाईन करून देखील विक्री केल्या जातात. या कारखान्यांमध्ये कोणत्या पद्धतीची वस्तू बनवायची आहे याची अगोदर डिझाईन तयार होते व नंतर मशीनच्या माध्यमातून तयार डिझाईन प्रमाणे लाकूड कट केले जाते व त्यानंतर टेक्स्ट व लोगो छापून डिझाईनच्या गरजेप्रमाणे कटिंग तसेच फिनिशिंग आणि पॉलिश केल्यानंतर उत्पादन तयार होते.

विक्री व्यवस्थापन करण्यासाठी सोशल मीडियाचा केला वापर

त्यांनी तयार केलेल्या सर्व वस्तूंची विक्री करता यावी याकरिता सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली व त्यासोबतच मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंची विक्री व्हायला लागली. एवढेच नाही तर काही वेबसाईटच्या माध्यमातून देखील लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या या उत्पादनांची खरेदी केली जाते व एखाद्या संस्थेला किंवा कंपनीला जास्त मालाची गरज असेल तर एकाच वेळी जास्त वस्तूंची ऑर्डर त्यांना मिळते व दुसरा महत्त्वाचा त्यांचा विक्रीचा प्लॅटफॉर्म म्हणजे जर एखाद्या ठिकाणी इको फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन भरले असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या जंगल बाउंड या ब्रँडच्या वस्तूंची ब्रॅण्डिंग ते मोठ्या प्रमाणावर करतात.

या व्यवसायातून किती मिळाले त्यांना उत्पन्न?

साधारणपणे चार वर्षापासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून तो आता यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलेला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून चालू वर्षाचा विचार केला तर त्यांच्या जंगल बाउंड या ब्रँडने 30 लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर केलेला आहे. कारण दिवसेंदिवस लोक हे पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक होत असून पर्यावरण पूरकतेकडे लोकांचा कल वाढताना दिसून येत आहे व त्यामुळे अशा पर्यावरण पूरक वस्तूंची मागणी देखील वाढत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या व्यवसायात आणखीन वाढ करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe