सरकारी नौकरी लावून देतो असे भासवून तरुणाला 18 लाखांना गंडवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- सरकारी विभागात नौकरी लावून देतो असे अमिश दाखवून तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले मध्ये घडला आहे.

याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेखर नंदू वाघमारे (वय 30,रा.अकोले पोलीस स्टेशनच्या मागे अकोले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन गंगाधर जोंधळे

(रा.कोकणगाव,तालुका,संगमनेर), विजयकुमार श्रीपती पाटील (पुणे) यांच्याविरूद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माझे नातेवाईकांच्या मित्राच्या ओळखीने ओळख झालेले नितीन गंगाधर जोंधळे, विजयकुमार श्रीपती पाटील यांनी मला वेळोवेळी माझी मंत्रालयात व मंत्र्याशी मोठ्या प्रमाणात ओळख आहे.

मी अनेकांना शासकीय नोकरीला लावलेले आहे. तुम्ही पैसे द्या तुम्हलाही महसूल विभागाच्या आरक्षीत कोठ्यातून नोकरीला लावून देतो.

पैसे दिले तर तुम्हाला तलाठी पदावर नियुक्ती करुन देतो असे वारंवार सांगत असल्याने यावेळी नितीन जोंधळे व विजयकुमार श्रीपती पाटील यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी रक्कम घेत तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपये घेतले.

मात्र पैसे देवुनही कोणत्याही प्रकारचे तलाठी पदाचे अपॉइंटमेंट लेटर,अर्थात नियुक्ती पत्र न मिळाल्याने दोघांनी फिर्यादीची रक्कम 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याने फिर्यादी नितीन गंगाधर जोंधळे यांचेकडे सदर दिलेल्या पैशाची पुन्हा मागणी केली.

वरील दोघा भामट्यांनी फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe