अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील पाच शासकीय कोविड केंद्रांना एक लाख रुपये किंमतीची कोरोना उपचार उपयोगी औषधे व प्रतिबंधात्मक साहित्य प्राथमिक शिक्षकाने दिले .
प्राथमिक शिक्षकांची मदत ही प्राणवायूसारखी अनमोल आहे. प्राथ. शिक्षकांचे समाजाविषयीचे संवेदनशील उत्तरदायित्व यांतून प्रखरतेने दिसून येते.

या उपक्रमांतून शिक्षकांनी एक नवा आदर्शच निर्माण केलेला आहे असे प्रतिपादन पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले .
नगर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा संदीप गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व कोविड केंद्रांच्या संदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक आम्ही -अहमदनगर या ग्रुपच्या वतीने कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्यासाठी कार्यरत असलेले
कोरोना योद्धे यांना प्रत्यक्ष मदत देण्याच्या उद्देशाने जि.प.च्या प्राथ. शिक्षक मित्र मंडळाने सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करून मदतनिधी उभारण्यात आला.
त्यामधून पाच ही कोविड केंद्रांना वस्तू रूपाने मदत देताना सुमारे एक लाख रुपये किंमतीचे साहित्य आणि कोरोना उपचारासाठी उपयुक्त औषधे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांचेकडे हे साहित्य सूपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी शिक्षकांनी केलेल्या मदतीबद्दल प्राथ. शिक्षकांना धन्यवाद दिले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|