अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- भारतात तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना विकल्या. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे.
मोदी यांच्या या कृतीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी मुंबईतील लसीकरणाच्या केंद्राबाहेर आंदोलन पुकारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी केली.
केंद्र सरकारच्या विरोधातील या आंदोलनाची सुरुवात उत्तर मुंबईतून होईल. सकाळी दहा ते अकरा या वेळेत काँग्रसचे कार्यकर्ते मुंबईत ३६ विधानसभा क्षेत्रात मार्केट किंवा लसीकरणाच्या ठिकाणी मानवी साखळी करतील.
मास्क, अंतर राखून साखळी करतील. ‘मोदीजी, हमारी बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया हे?’ हे पोस्टर्स कार्यकर्त्यांच्या हातात असतील. प्रत्येक दिवशी सर्व विधानसभा क्षेत्रात उद्यापासून सहा दिवस आंदोलन सुरू राहील, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.
म्यूकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शन अतिशय महागडी आहेत. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. त्यातच केंद्र सरकारने राज्य सरकारांना ही इंजेक्शन खरेदी करण्याची मनाई केली आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत असल्याचे जगताप यांनी या वेळी बोलताना सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम