अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-नगर – यतीमखाना संचलित अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत बन्सी चौगुले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुळगावी ढवळपुरी, ता.पारनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.चौगुले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
स्व.चौगुले हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी कार्यवाह, विना अनुदानित संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन योजनेचे नाशिक विभागाचे संयोजक म्हणून शिक्षक संघटनेचे काम पाहत होते.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत. निवेदने, आंदोलने आदिंच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. लढावू शिक्षक नेते म्हणून ते परिचित होते.
त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातही ते सक्रिय असत. गावातील उपक्रमांसाठीही पुढाकार घेत. मनमिळावू स्वभावामुळे अनेक संघटना, पत्रकार, संस्थांशी त्यांचे संबंध होते.
त्यांच्या अकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघटना व शिक्षक परिषदेच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|