अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक पुरस्कार मिळालेले न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संतोष पोपटराव कानडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळालेली बक्षिसाची रक्कम आपल्या गावाकडील शाळेस रंगकामासाठी मदत दिली.
माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संतोष कानडे व प्रा.रावसाहेब राशिनकर या दोन माजी विद्यार्थी असलेल्या गुणवंत सेवकांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारणी सदस्य डॉ.दिपकजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर नानासाहेब अंबाडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
यावेळी प्राचार्य किसन सुकटे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक एच.के. जावळे, ज्येष्ठ शिक्षक लहानू ताठे, अर्जुन वैरागर, कलाशिक्षक पोपट मते, अनंता शेळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख हरीश दगडखैर, राजेश शेंडगे, रुख्मिनी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार,
पंचवटी उद्योग समुहाचे बाळासाहेब जावळे, संदीप जावळे, संतोष बोरुडे, किरण जावळे, प्रशांत दहातोंडे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कानडे यांना नुकताच पुणे विद्यापीठात कुलगुरुंच्या हस्ते गुणवंत सेवक पुरस्कार देण्यात आला होता.
या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास 5 हजार रुपयाची मदत रंगकामासाठी प्राचार्य किसन सुकटे यांच्याकडे सुपुर्द केली. स्वाती दळवी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक लहानू ताठे यांनी आभार मानले.
- किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|