अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्य पोलीस दलातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 6 निरीक्षकांचा समावेश आहे. वर्षभरापासून सहाय्यक निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत होते.
मात्र, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नव्हता. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न रखडला होता, तो आता मार्गी लागला आहे.
गृह विभागाने नुकतेच याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील 6 जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती सहाय्यक निरीक्षक दीपक बोरसे, जनार्दन सोनवणे, सतीश गावित, मोहन बोरसे, नीलेश कांबळे आणि शाहिदखान पठाण या 6 जणांचा पदोन्नतीत समावेश आहे.
राज्य पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नत्यांमध्ये अनियमितता होती. त्यामुळे राज्य पोलीस दलातील निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |