‘त्या’ बापलेकाच्या हॉटेलवर सुरु होता ‘वेश्याव्यवसाय’…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  हॉटेल राजयोग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी अनिल माणिकराव कर्डिले (वय ५२) व त्याचा मुलगा अक्षय अनिल कर्डिले (वय २५ दोघे रा. खंडागळा) या दोघा बापलेकांना अटक केली आहे.

दरम्यान, नगर-पुणे रोडवरील काही हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने राजरोसपणे वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हॉटेल राजयोग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी तेथून काही मुलींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तीन परप्रांतीय मुलींना स्नेहालय संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी फिर्याद दिली असून, सहायक निरीक्षक सानप हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News