जिल्ह्यासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध करा: आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे त्यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लशीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली.

यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आमदार जगताप यांनी नगर शहरात कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण करत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

लहान मुलांसाठी धोक्याच्या असलेल्या तिसऱ्या लाटेसाठी नगर शहरातील बालरोग समितीच्या माध्यमातून करत असलेल्या उपाय योजनासंदर्भातही त्यांनी माहिती दिली.

मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्याला लशीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट सर्वांच्या सहकार्याने हद्दपार करायचे आहे. त्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe