अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता या पुराचे पाणी जेऊर मधील व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले,आदीच कोरोनाच्या काळात व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडला असताना,पुरा मुळे मोठे नुकसान झाले आहे,त्यामुळे जेऊर गावातील व्यवसायिक हवालदील झाला आहे.
आधीच व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे त्यातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ताबडतोब या व्यावसायिकांच्या दुकानांचे नुकसानाचे पंचनामे करून अर्थसहाय्य करावे तसेच नगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभे पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे.
तरी या नुकसानग्रस्त शेतकर्यांची ताबडतोब पंचनामे करून शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणाचा संपर्क तुटला. धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना लवकरात- लवकर आर्थिक सहाय्य शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मा.मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम