रुग्णांच्या संख्येइतके रेमडेसिवीर पुरवावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून एचआरसीटी स्कोर वाढण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे डाॅक्टरांकडून रेमडेसिवीर देण्याची मागणी होत आहे.

इतर औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे रेमडेसिवीर उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची हेळसांड सुरू आहे. यासाठी रुग्णसंख्येइतके इंजेक्शन तसेच इतर औषधांचा पुरवठा करण्यात यावा,

तसेच कोविड तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीन कोल्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कोल्हे यांनी मंत्रालयात भेट घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली. यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील निवेदन दिले. त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe