अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लाॅकडाऊन असतानाही हॉटेल सुरू ठेवून ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या पुण्यातील हॉटेल मालकाला महापालिकेने १ लाख रुपयाचा दंड ठोठावला.
पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनमध्ये ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल चालकाकडून करण्यात आल्याने, महापालिकेने हॉटेल मालकाकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईची चर्चा शहरात रंगली होती.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नसल्याने, राज्यभरात ३१ मे अखेरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
त्या दरम्यान अनेक गोष्टीवर निर्बंध लादण्यात आले असून त्याचाच एक भाग असलेला हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाने नियमांच उल्लंघन करीत हॉटेलमध्ये ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
या बाबतची माहिती भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्यावर त्यांनी हॉटेल मालकास करोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख रुपयांचा दंड आकारला असून, त्याचा धनादेश देखील घेण्यात आला आहे.
यापुढे अशी घटना झाल्यास हॉटेल सील केले जाईल, अशी समज देण्यात आल्याचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार मार्फत अनेक उपाय योजना करण्यात येत आहे. मात्र अनेक नागरीक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम