मालमता थकबाकी प्रकरणी प्रांताधिकाऱ्यानी केली दंडात्मक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांची मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई आज रविवारी दिवशी करण्यात आली.

दरम्यान ही कारवाई शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार सहा रूपये,

हॉटेल गारवाकडे ५९ हजार ४११ रूपये तसेच आनंद कॉटेक्सकडे (जिनिंग मिल ) रक्कम ३ लाख ८८ हजार ७८९ रूपये मालमत्ता कर थकबाकी होती.

नगर परिषदेच्या पथकाने प्रशासक तथा प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल संकेत, हॉटेल गारवा व आनंद कॉटेक्स (जिनिंग मिल) या तीनही मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई केली.

शेवगाव नगरपरिषद पदाधिकारी यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी केकाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रशासक केकाण यांनी नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठख घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर थकित मालमत्ता कर धारकांवर कारवाईचे संकेत दिले होते.

थकीत मालमत्ता धारकांची कर वसुली मोहिम सुरू करून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकेल.

तसेच शहराच्या विकासकामांना चालना मिळेल या उद्देशाने प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe