अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या मार्फत अहमदनगर शहरातील लसीकरण डोस बाबत माहिती घेतली असता
आज पर्यंत अहमदनगर महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटल मिळून शहरातला १ लाख २६ हजार डोस चे वितरण केले असून अजूनही ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसत नाही आजही अनेक ज्येष्ठ नागरिक पहिल्या डोस पासून वंचित आहेत.
त्यामुळे ४ लाख लोक संख्येच्या शहरात ईतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊन देखिल ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध होत नाही त्यामुळे लसीचे डोस गेले कुणीकडे असा सवाल मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन केला आहे.
झालेल्या लसीकरनाचे ऑडिट होणे खुप गरजेचे आहे. तसेच अहमदनगर शहरात राजकिय पुढाऱ्यांच्या मार्फत खाजगी हॉटेल, राजकिय लोकप्रतिनिधी यांच्या घरात जाऊन लसीकरण केले जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सूरू आहे.
त्यातच १८ वर्षाखालील मुलांना सुध्दा अश्या खाजगी जागेमध्ये लसीकरण होत असल्याची चर्चा शहरात सूरू आहे. शहरातील राजकिय पुढाऱ्यांना खाजगीत घरी जाऊन लसीकरण केले जाते लसीचे डोस वितरित केले जाते अशी चर्चा शहरात जोर धरत आहे.
अहमदनगर शहरात आठ लसीकरण केंद्र व जवळ्पास २० उपकेंद्र सूरू आसून हे सर्व लसीकरण केंद्र स्थानीक नगरसेवकांच्या ताब्यात असल्यामुळें त्यांचे हितचिंतक व नातेवाईकांना सोडुन सर्व सामान्य नागरिकांना लस मिळतं नसल्याचे दिसून येत आहे.
त्यातूनच लस च्या बॉटल पलविण्याचे प्रकार सुध्दा अहमदनगर शहरात घडत असल्याचे समजत आहे. अश्या सर्व प्रकारामुळे लसी खराब सुध्दा झाल्या असतील व खराब डोस चे लसीकरण जर नागरिकांना होत असेल
तर त्या झालेला लासिकरनाचा काय उपयोग होणार असा सवाल मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आला . या सर्व अहमदनगर शहरातील प्रकराला आयुक्त व आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत.
त्यामुळे आपण अहमदनगर शहरातील चाललेल्या लसीकरण मोहीमेत लक्ष्य घालून आता पर्यंत झालेल्या लसीकरनाचे ऑडिट करावे. सर्व नगरसेवकांनी मागणी केलेले मान्यता दिलेले लसीकरण उपकेंद्र बंध करावे मुख्य शहरातील लसीकरण केंद्रातून लसीकरण नागरिकांना करावे
अशी मागणी मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन केली आहे. तसेच या लसीकरणाच्या गोंधळाला कारणीभूत असणाऱ्या महानगरपालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुध्दा मनसेचे नितीन भुतारे यांनी आरोग्य मंत्री यांना केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम