राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र; म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे रोज नवनवीन विक्रम करत आहे.

तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्था आणि औषधी, व्हेंटिलेटर यांच्या पुरवठ्याचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत.

गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीरचा तर प्रचंड तुटवडा आहे. याच इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यासह राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

इजेक्शन मिळत नसल्‍याच्या कारणाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घ्यावी. जिल्ह्यासाठी तातडीने या इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा,

अशी मागणी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी बोलताना विखे म्हणाले कि, जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक जाला आहे.

त्यामुळं सर्व शासकीय दवाखाने आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आहेत. यातील अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज लागते.

पण अनेक ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध असतानाही रुग्णांना दिलं जात नाही. तर अनेक मेडिकलही इंजेक्शन असूनही देत नाहीत.

त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. शासनाने या इंजेक्शनचा काळाबाजर रोखत जिल्ह्यात आणि राहाता तालुक्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा त्वरीत उपलब्ध करुन द्यावा.

जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, हॉस्पीटल मध्ये बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर सुध्दा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.

प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने याबातही आपण व्यक्तिगत लक्ष घालून जनतेला दिलासा देण्यासाठी संबधिताना सूचना द्याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|