मुळा धरण ‘इतके’ भरले ! जाणून घ्या सविस्तर अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुळा धरणात २४२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी वाढले असून धरण शनिवारी ६० टक्के भरले आहे.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत पाणलाेट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे व कोतूळकडून ७ हजार ५४२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी मुळा धरणात जमा झाले आहे.

२६ जूनपासून कोतूळकडून मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. जून महिन्यात मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची ८ हजार १५२ दशलक्ष घनफूट नोंद होती.

प्रारंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी धरणात येण्यास सुरुवात झाली. घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने मागील आठवड्यापासून कोतूळकडील पाण्याची आवक वाढत चालली आहे.

शनिवारी कोतूळकडुन मुळा धरणात ४ हजार ६४३ क्युसेकने, तर सायंकाळी ६ वाजता ३ हजार ८२२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News