आगामी काही दिवसात राज्यात असा असणार पावसाचा अंदाज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- गेली अनेक दिवसांपासून दडून बसलेला पावसाने अखेर राज्यात आगमन केले आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस झाला असून यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान मध्य महाराष्ट्रात मोडणार्‍या नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विस्कळीत स्वरूपात पाऊस पडत असून पुढील चार दिवस म्हणजेच 21 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसासह काही ठिकाणी तुरळक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान पावसाबाबतचा हा अंदाज पुणे आयएमडीच्या अहवालमध्ये वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात 18 जुलैला बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार, 19 जुलैला बर्‍याच ठिकाणी पावसासह घाट विभागात तुरळक जोरदार पावसाची शक्यता आहे.

20 आणि 21 जुलैला बर्‍याच ठिकाणी पावसासह घाट विभागात तुरळक अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर चांगला पाऊस कोसळत आहे.

हवामान विभागाने रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातार्‍यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

यासह पुढील चार दिवस कोकणात भरपूर पाऊस होणार असून काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यात पुणे आयएमडीकडून वर्तविण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe