‘मी नाही म्हणत असतानाही राज कुंद्रा मला सतत किस करत होता…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दररोज राज कुंद्रा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

काही मॉडेल्सकडून या प्रकरणाच्या इतर बाजूंचा उलगडा होतो आहे. या प्रकरणी अभिनेत्री मॉडेल शर्लिन चोप्राने सर्वात पहिले जबाब नोंदवला. या जबाबात शर्लिनने राजविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. २०१९ मध्ये राजने शर्लिनच्या मॅनेजरशी संपर्क केला होता.

त्यानंतर २७ मार्च २०१९ मीटिंग झाली. त्यानंतर शर्लिन आणि राज यांच्यात टेक्स मेसेजवरून संवाद झाला. मेसेज वरून झालेल्या वादानंतर राज अचानक शर्लिनच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर शर्लिनने नकार दिल्यानंतरही राज तिला किस करत होता असे शर्लिन म्हणाली.

‘मला कोणत्याही विवाहीत पुरुषाशी संबंध ठेवायचे नव्हते’ असे शर्लिन राजला म्हणाली. त्यावर उत्तर देत राज शर्लिनला म्हणाला, ‘माझे आणि शिल्पाचे संबंध ठीक नाहीत, आमच्यात वाद सुरू आहेत.’ पुढे शर्लिन म्हणाली, ‘मी राजला थांबवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने मी घाबरले आणि राजला धक्का देऊन बाथरुममध्ये पळाले.

’ राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची ही चौकशी केली होती. राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe