अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही.
तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्यावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रामधून राज ठाकरे यांनी मोदींसमोर काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे.
राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी,
लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा यासाठी राज्यांना स्वतंत्र अधिकार द्यावेत अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.
कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले.
तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत.
आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|