Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात आज प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभू श्री रामाच्या मूर्तीची पूजा विधी गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली आहे.
देशभरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक VIP लोक यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आता तुम्हालाही देखील प्रश्न पडला असेल की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली जाते? प्रख्यात विद्वानांच्या मते, एखाद्याने स्वतःचे जीवन पवित्र केल्याशिवाय मूर्तीची पूजा करू नये. जर असे न केल्यास त्या व्यक्तीला उपासनेचे शुभ फळ मिळत नाही.
प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय?
धर्म गुरूंच्या मते मंदिरात किंवा घरात एखाद्या मूर्तीच्या स्थापना करायची असेल तर तिची प्रतिष्ठापना करताना मूर्ती जिवंत करण्याच्या पद्धतीला प्राणप्रतिष्ठा असे म्हंटले जाते. आजही 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातही प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा आज अभिषेक केला जाणार आहे. 16 जानेवारीपासून अयोध्येच्या राम मंदिरात अनेक कार्यक्रम सुरु झाले आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीरूपात असलेल्या देवी-देवतांची पूजा केली जाते.
प्राण प्रतिष्ठेचा अर्थ
तुम्हालाही प्राण प्रतिष्ठेचा अर्थ माहिती नसेल. प्राण प्रतिष्ठेचा अर्थ असा होतो की, मूर्तीमध्ये देवता किंवा देवाचे शक्ती स्वरूप स्थापित करणे होय. जेव्हा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते तेव्हा पूजा, धार्मिक विधी आणि मंत्रजप केले जातात. अनेकदा दगडाच्या मूर्ती घरात न ठेवणायचा सल्ला दिला जातो. पाषाणाच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर त्याची दररोज पूजा करणे आवश्यक असते.
अभिषेक करण्याची पद्धत
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना अनेक प्रकारची पूजा करावी लागते. मूर्तीला गंगाजल किंवा वेगवेगळ्या पाच नद्यांच्या पाण्याने स्नान घालावे लागते. त्यानंतर मऊ कापडाने पुसून नवीन वस्त्र घातले जातात. यावेळी वेगवेगळी विधी-पूजा केली जाते. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद दिला जातो.