रणबीर कपूर- आलिया भट्ट यांच्या नात्याविषयी ‘ह्या’बॉलिवूड स्टारचे मोठे वक्तव्य ; युजर्सचा रागाचा पारा चढला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. अलीकडेच, त्याने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाबद्दल अपशब्द वापरले होते, तेव्हाही त्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.

याशिवाय त्यांनी गायक मिका सिंगलाही सोडले नाही आणि हा वाद अजूनही चालू आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता अशी बातमी आली आहे की रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील संबंधाबाबत कमल यांनी आपले वादग्रस्त विधान जारी केले आहे, यामुळे कमल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दोघेही घटस्फोट घेतील – केआरकेने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पुन्हा एकदा बॉलिवूडचे सुपर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नात्याबद्दल भाकीत केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करतील पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकणार नाही आणि त्यांचे घटस्फोट होईल.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “भविष्यवाणी 08 – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2022 च्या अखेरीस लग्न करतील, पण रणबीर कपूर लग्नाच्या 15 वर्षांतच घटस्फोट देईल.”

केआरके ट्रोल होत आहे – कमल आर खान यांनी वादग्रस्त ट्विट केल्यापासून लोक त्यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करीत आहेत. एका यूजर ने लिहिले आहे की, ‘सलमान खानने सोडून दिले म्हणून काय आता बाकीच्यांसोबतही पंगा घेत आहे.’

‘तर दुसरा युजर लिहितो की’ सर्वप्रथम, तुम्ही एक चांगल्या मनोवैज्ञानिकास दाखवून घ्ये. रणबीरचे जे काही होईल ते होईल. तुमची मानसिक स्थिती ठीक नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe