शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- गाळा बांधकाम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान याप्रकरणी विजय रमेश सामलेटी यांनी ही फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते.

गाळ्याची देखरेख करत असताना गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले. यावेळी ते श्रीपाद छिंदम यांना म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तु मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही.

तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. मी सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू,

अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गिरीश जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe