अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका टॅक्सी चालकाने पार्टीतून घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एक 31 वर्षीय महिला पार्टीसाठी गेली होती. त्यादरम्यान तिने प्रचंड मद्यपान केलं होतं. अशात घरी जाता येणार नाही म्हणून पीडित महिलेच्या मित्रांनी तिच्यासाठी टॅक्सी बुक केली होती.
यावेळी ट्रक्सी चालकाच्या लक्षात आलं की महिलेला शुद्ध नाही आहे. त्याचाच त्याने फायदा घेत महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.
पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करीत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, पोलिसांनी पुष्टी केली की एका 37 वर्षीय व्यक्तीला महिलेसोबत बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
बलात्काराच्या घटनेनंतर सुमारे 10 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले.