रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून, शनिवारी (दि.३) झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले.

यामध्ये एकूण ९७ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साकत येथील 7७ दहिगाव ४, वाटेफळ 1 व वाळुंज येथील 1 असे एकूण 13 जण पॉझिटिव्ह आढळले.

दोन दिवसांपूर्वी 10 पॉझिटिव्ह आढळले होते. माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या पाठपुराव्याने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी दखल घेतल्याने शनिवारी रॅपिड टेस्ट घेण्यात आली.

यामध्ये केलेल्या चाचणीत गावातील आणखी ७ जणांची भर पडली आहे. गावात पाच दिवसांचा जनता कफ्र्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

रॅपिड एँटीजेन कॅम्प यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच वैद्यकीय अधिकारी एस. ए. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत यादव,

परिचारिका मनीषा बनसोड, संदीप भालसिंग, आशा सेविका स्वाती पाठक, मीना गायकवाड यांसह उपसरपंच बाबासाहेब चितळकर, अविनाश निमसे यांनी परिश्रम घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe