Ration Card : शिधापत्रिकाधाराकांना सरकारचे दिवाळी गिफ्ट, शंभर रुपयांत मिळणार…

Published on -

Ration Card:राज्यातील शिधापत्रिकाधारकांना दिवाळीत दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल त्यांना मिळणार आहे.

राज्यातील ७ कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या मंत्रिमंडळाने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

असे असले तरी दिवाळी जवळ आलेली असताना याचे वितरण नेमके कसे केले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe