Ration Card News : रेशनकार्ड काढायचं, मग तर पैसे लागणार. त्याचबरोबर एजंटाकडून लवकर मिळणार हाच आतापर्यंतचा सर्वांना अनुभव आहे; मात्र, शासनाने रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांना रेशनकार्ड पूर्णत: विनाशुल्क मिळणार आहे.
या निर्णयामुळे एजंटांचा बाजार उठणार असून, नागरिकांची होणारी धावपळही थांबणार आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ही माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकायाकडे जमा होणार आहे.
![Ration Card News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/05/ahmednagarlive24-Ration-Card-News.jpeg)
त्यानंतर अर्जदार हा नेमका कुठल्या प्रकारातील आहे यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. जर अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच त्यासाठी रेशन अधिकायांना व कर्मचायांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे असे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे.
रेशन कार्ड करता येणार डाऊनलोड
पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वी सात दिवस लागायचे, आता देखील याच मुदतीत ते कार्ड मिळणार आहे. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइनच डाऊनलोड करता येणार आहे,
त्यात त्याचे कार्ड कोणत्या दुकानदाराला नेमण्यात आलेले आहे, याचादेखील उल्लेख असणार आहे. ही सुविधा सर्वांसाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन रेशन कार्ड काढणे आता अधिक सुलभ झाले आहे
सरकारच्या ह्या निर्णयामुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. एजंटगिरीला बसणार चाप आहे आणि त्याची माहिती ऑनलाइनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.तसेच रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. या ऑनलाइन सुविधेमुळे ही लॉबी तुटणार आहे. त्याचा सामान्यांना मोठा फायदा होणार आहे
रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एजंटांना हाताशी धरूनच त्यांना पैसे चारूनच ते मिळत होते. अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा झाला होता. त्यात सुळसुळाट झाल अनेक अधिकारीदेखील सामील होते. त्यामुळे सामान्यांना वीस रुपयात मिळणारे रेशनकार्ड दोन हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत होते.
आता आळा बसणार आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आता सामान्यांना ऑनलाइन पद्धतीने रेशनकार्ड काढता येणार आहे. त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही, अर्थात ते मोफत उपलब्ध होणार आहे