RBI New Rule : देशात सरकारी आणि खासगी अशा अनेक बँका आहेत. प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे असतात. शिवाय त्यांचे व्याजदरही वेगळे असते. जर तुम्ही कोणत्याही बँकेत खाते काढत असाल तर तुम्हाला त्यापूर्वी बँकेची सर्व माहिती असावी लागते.
नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नियम आणला आहे, जर तुम्हाला तो नियम माहिती नसेल तर तुम्हाला विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागेल. काय सांगतो बँकेचा नवीन नियम जाणून घ्या.

आरबीआयच्या नवीन निर्देशानुसार बँकेला खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवण्यास सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बँकेकडून आपली रक्कम निश्चित करण्यात आली आहे. जर या निश्चित रकमेपेक्षा कमी शिल्लक असेल तर खातेधारकांकडून ठराविक शुल्क आकारले जाते. विविध बँका वेगवेगळे शुल्क आकारत असतात. हे लक्षात ठेवा की शहरी भागात जास्त दंड आकारण्यात येतो आणि ग्रामीण भागात कमी दंड आकारण्यात येतो.
एसएमएस-ईमेल किंवा पत्र पाठवून दिली जाते माहिती
आरबीआयच्या निर्देशांनुसार, बँकांना ग्राहकांना कमीत कमी शिल्लक न ठेवल्याबद्दल माहिती द्यावी लागणार आहे. जर महिनाभरात थकबाकी न ठेवल्यास दंड आकारण्याच्या सूचना आहेत. तसेच यासाठी बँका एसएमएस, ईमेल किंवा पत्र पाठवू शकतात.
हे लक्षात घ्या की, बँका ग्राहकांना शिल्लक राखण्यासाठी वेळ दिला जातो, जी फक्त एक महिन्यापर्यंत असण्याची शक्यता असते. या मुदतीनंतर बँका ग्राहकांना माहिती देऊ शकतील आणि आपल्या ग्राहकांकडून दंड आकारू शकतील.
किमान शिल्लक राखण्यासाठी रक्कम कमी असल्याने त्याच प्रमाणात दंड आकारला जाऊ शकतो, म्हणजेच केवळ निश्चित टक्केवारीच्या आधारावर शुल्क आकारतात. त्यासाठी बँकाकडून स्लॅब बनवला जातो. हे लक्षात ठेवा ही हे शुल्क वैध असले पाहिजे तसेच ते सरासरी खर्चापेक्षा जास्त नसावे. लक्षात ठेवा की किमान शिल्लक न ठेवल्याबद्दलचा दंड खाते ऋणात्मक किंवा मायनसमध्ये जाऊ नये.