Vastu Tips: ‘या’ लक्षणांवरून ओळखा तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही; असेल तर करा हे उपाय

Ajay Patil
Published:
vastu dosh

Vastu Tips:- वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम करण्यापासून तर घराची अंतर्गत रचना आणि घरातील कुठली वस्तू कुठे असावी यासंबंधीचे नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर घरामध्ये वास्तुदोष होण्याची शक्यता संभवते.बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की वास्तुदोष असल्यावर बऱ्याच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागते.

परंतु बऱ्याच व्यक्तींना माहिती नसते की आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही? परंतु वास्तुदोष ओळखण्याची काही लक्षणे असून ती जर तुमच्या घरात किंवा कुटुंबात दिसत असतील तर तुम्ही  घरामध्ये वास्तुदोष आहे हे ओळखू शकतात व लवकर त्यावर उपाय करून समस्यांमधून मुक्तता मिळवू शकता. त्यामुळे आपण या लेखात काही यावरचे उपाय पाहू

 तुमच्याही घरांमध्ये दिसत असतील ही लक्षणे तर असू शकतो वास्तुदोष

1- आर्थिक समस्या उद्भवणे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पैसा कमावत आहात परंतु तरी देखील पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा पैशांची बचत होत नसेल आणि खर्चामध्ये सातत्याने वाढ होत असेल तर हे वास्तुदोषाचे लक्षण असण्याची शक्यता असते.

2- कुटुंबातील कलह कुठलेही मोठ्या स्वरूपाचे कारण नसताना देखील घरातील म्हणजेच कुटुंबातील सदस्यांमध्ये जर सतत भांडणे किंवा वाद उद्भवत असतील तर हे देखील वास्तुदोष दर्शवते.

3- आरोग्याच्या संबंधित समस्या तुमच्या घरातील सदस्य म्हणजेच कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील किंवा वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा सतत आरोग्याच्या समस्या असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण असू शकते.

 यावर करा हे उपाय मिळेल फायदा

1- वास्तुशांतीची पूजा घरामध्ये असलेले नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याकरिता तुम्ही वास्तुशांतीची पूजा करणे गरजेचे आहे. पूजा करताना घंटा किंवा शंख वाजवावा व यामुळे त्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते व सकारात्मक ऊर्जा खेळती राहते.

2- घरामध्ये वास्तू पिरॅमिड ठेवावा घराच्या उत्तर-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम कोपऱ्यामध्ये चांदीची वास्तू पिरॅमिड किंवा तर कोणत्याही चांदीची वस्तू ठेवणे गरजेचे आहे.

3- घराच्या मुख्य दरवाजाची दिशा बदल घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला जर मुख्य दरवाजा असेल तर घराच्या मुख्य दरवाजाची दिशा बदलावी किंवा मुख्य प्रवेशद्वारावर ओम किंवा स्वस्तिकाचे निशाणी करावी.

4- गंगाजल घरात शिंपडावे घरामधील वास्तुदोष टाळायचा असेल तर गंगाजल शिंपडणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. गंगाजल घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करते.

( टीप वरील माहिती ही वाचकांसाठी माहिती म्हणून सादर केलेली आहे. या विषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe