कोर्टात जाण्यांपूर्वी हे वाचा; वेळेत झालाय हा बदल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत तर दुपारच्या सत्राचे कामकाज दुपारी दीड ते सायंकाळी चार यावेळेत चालणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवसब वाहू लागले आहे.

यातच गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे सरकारी कार्यालयनमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचं उपस्थिती ठेवण्यास सांगितले आहे. तर यातच आता न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला आहे.

नगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाचे दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल, असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे.

पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत तर दुपारच्या सत्राचे कामकाज दुपारी दीड ते सायंकाळी चार यावेळेत चालणार आहे. दिनांक २६ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत हा बदल असणार आहे.

वकील, पक्षकार अथवा साक्षीदार गैरहजर असले, तरी न्यायाधिशांनी प्रतिकूल आदेश करु नयेत. जे वकील, पक्षकार, साक्षीदार अथवा आरोपी यांची न्यायालयासमोर उपस्थिती आवश्यक आहे,

त्यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रदेश दिला जाणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe