अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढतच आहेत दररोज वाढणाऱ्या ह्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर ताण आला आहे.
या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता नावा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे.
उद्यापासून अहमदनगर शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाच्या कारवाई व्यतिरिक्त वैद्यकिय पथकामार्फत कोरोना टेस्ट देखील करण्यात येणार आहे.
त्यामधे पॅाझिटीव्ह आढळणाऱ्या नागरीकांना सरळ शासकिय कोव्हीड केअर सेंटर मधे दाखल करण्यात येईल,
तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील कॅान्टॅक्ट ट्रेसींग करून कोव्हीड टेस्ट करण्यात येईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम