अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- हिवरेबाजार::दुपारची १२ ची वेळ,राज्यस्तरावरील प्रशिक्षकांची मृद, जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती,एवढ्यात अचानक हबीबभाईंचा लाऊडस्पीकर वरील आवाज ऐकू आला, “वणवा लागलायं.. मदतीसाठी धावा..” तब्बल २५ हून अधिक प्रशिक्षकांनी पडलेली पोती ओली करून
वणव्याच्या दिशेने धावले,जमेल तसे ते आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, काही मिनिटात गावातील जेष्ठ,युवकांनी हातात ओले पोते घेऊन डोंगरावर धाव घेत काही मिनिटात सारा वणवा विझवला.
गेली ३० वर्षे निसर्गाच्या संगोपनासाठी आणि गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोत्तम योगदान देत आदर्श गाव असा सर्वदूर लौकिक वाढवणाऱ्या हिवरेबाजार मध्ये हि घटना घडली.यातून नागरिकांच्या एकोप्याचा प्रत्यय आला तर प्रशिक्षणार्थींना थेट वणवा विझविण्याचा अनुभव मिळाला.
गावाच्या सर्वांगिण विकासासाठी तण,मन,धन समर्पित करणारी मजबूत भावना असलेल्या आदर्श गाव हिवरेबाजार (जि. अहमदनगर) मध्ये गुरुवारी दि.११ रोजी दुपारी १२ वा घटना घडली.राज्यात नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांना प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करण्यासाठी प्रविण प्रशिक्षकांच्या यशदा मार्फत कार्यशाळा सुरू आहेत.
यातील थिमटिक प्रशिक्षणातील मृद, जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षकांची कार्यशाळा सुरू आहे.कार्यशाळेच्या हाँलच्या मागील बाजूच्या रोड्याच्या डोंगरावर दु.१२ च्या दरम्यान शाँर्टसर्किटने अचानक वणवा लागलेला. सामाजिक कार्यकर्ते हबीबभाई सय्यद यांनी पाहिले. आणि क्षणार्धात त्यांनी प्रशिक्षण हाँलमधील प्रशिक्षकाना मदतीसाठी येण्याची आव्हान करताच सर्वांनी जमेल तसा वणवा विझविण्यासाठी योगदान दिले.
मात्र वणव्याचा धूर पाहून अवघ्या काही मिनिटात हिवरेबाजार मधील जेष्ठ,युवकांची येऊन वणवा विझवण्यासाठी दाखवलेली तत्परता पाहून महाराष्ट्रातून आलेले प्रशिक्षक अचंबित झाले. गावातील वनसंपदा जोपासण्यासाठी आईने डोक्यावरून पाणी तर वडिलांनी केलेल्या श्रमदानातून फुललेली वनसंपदा जणू आपल्या मालकीची असलेली भावना वणवा विझवताना दिसली. या घटनेची प्रतिक्रिया देताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी ‘गाव आपलाच आहे,हि भावना गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.गाव विकासात युवकच पुढाकार घेत असल्याचे’ सांगितले.
राज्यभरातून मृद, जलसंधारण, वनीकरण विषयावर तयार होणाऱ्या सातारा,कोल्हापूर, सोलापूर,लातूर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव, नाशिक, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी गावभेटीतील अनुभवाबरोबर एकजूटीचा प्रत्यय पाहून साऱ्या गावाला सलाम केला.याच प्रशिक्षणासाठी यशदाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रांजल शिंदे,
,आदर्श सरपंच पोपटराव पवार, प्राचार्य महेंद्र पांगळ (मुरुड),प्राचार्य विजय जाधव (सातारा), जलसंधारणासाठी योगदान देणारे संजय फल्ले(राजगुरूनगर),युवा प्रविण प्रशिक्षक अंबादास खडसण, पाणी फाऊंडेशन शरद भानगडे आदी तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे भविष्यात प्रशिक्षण घेण्यासाठी हि नवी प्रशिक्षकांची टीम अधिक प्रभावीपणे जबाबदारी पार पाडण्यास तयार झाली आहे.
प्रसंग वणव्याचा घडला मात्र यातून आदर्श गाव हिवरेबाजार होण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकांची गावाच्या विकासाबद्दल असलेली नाळ किती घट्ट असल्याचा समोर आले तर प्रशिक्षकांना थेट वणवा विझविण्याचे प्रात्यक्षिक करायला मिळाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|