अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसंदर्भात आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली.
या बैठकीत उपमहापौरपदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपला आता थेट विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
काँग्रेस आणि बसपाच्या चौघांची फरफट होईल, असे संकेत मिळत आहे. या दोघांनाही मुंबईच्या बैठकीपासून अलिप्त ठेवण्यात आले. सावेडीतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या १९ नगरसेवकांची बैठक झाली.
या बैठकीत अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाची चर्चा झाली. तसेच मुंबईत शिवसेना राष्ट्रवादी एकीचा झालेल्या निर्णयाची माहिती गटनेते संपत बारस्कर यांनी नगरसेवकांना दिली.
मुंबईचा निर्णय म्हटल्यानंतर मान्य करावेच लागेल, असे सांगत आगामी काळात विकास कामासाठी निधी वाटपात दुजाभाव नको, अशी मागणी यावेळी पुढे आली.
याच बैठकीत उपमहापौरपदावर चर्चा झाली. पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांनी त्यासाठी इच्छा व्यक्त केली. दोघांची नावे आमदार जगताप यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम