घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची रेकॉर्डब्रेक आवक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली आहे.

घोडेगाव येथील कांदा मार्केटला सर्वाधिक विक्रमी 70 हजार 248 गोण्या कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेतील वाढ कायम असून जास्तीत जास्त भावही 2400 रुपयांपर्यंत स्थिर आहेत.

दरम्यान बुधवारी 70 हजार 248 गोण्या (39 हजार 330 क्विंटल) आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती जवळपास 5 हजार गोण्या अधिक होती. मोठ्या मालाला 2000 ते 2100 रुपये भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाला 1800 ते 1900 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा/गोल्टीला 1000 ते 1400 रुपये तर एक-दोन वक्कलला 2200 ते 2400 रुपये भाव मिळाला.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली.

छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक, दुकानदार, कांदा बारदाना विक्रेते, हमाल, ट्रक चालक, टेम्पो चालक आदींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe